शबरीमाला हे मंदिर केरळच्या पेरियार टायगर रेजर्व च्या आत वसलेलं मंदिर आहे. मुख्य मंदिर (संनिधानम) डोंगर पठाराच्या ४० फुट वर आहे. मंदिराचा गाभारा आतून सगळा सोन्याने बनवलेला आहे. हे मंदिर विष्णू अवतार भगवान परशुरामानी बांधलेलं आहे असा इतिहास आहे. महाभारताच्या युद्धानंतर सरस्वती नदी भूगर्भात लुप्त झाली, तेव्हा श्रुतींच्या माध्यमातून वेद जाणणारे नंबुद्री ब्राह्मण लोकांना घेऊन भगवान परशुराम दक्षिण भारतात आले आणि केरळची निर्मिती केली. त्याच वेळी, त्यांनी शबरीमालाच्या डोंगरावर विष्णूचा भविष्य अवतार अय्यप्पा मंदिराची स्थापना केली.

अय्यपा मंदिराला १८ पायऱ्या आहे. कुठलाही अय्यपा भक्त डोक्यावर “इरुमुडीक्केतू” असल्याशिवाय त्या पवित्र पायऱ्या चढू शकत नाही. शबरीमालात पंपा गणपती मंदिर, निळकळ महादेव मंदिर, आणि पल्लीयारा भगवती मंदिर देखील आहे. भगवान अयाय्पाना हरिहरा देखील म्हटले जाते. याचा अर्थ होतो हरी आणि हरा (शिवा) चा लाडका!!!…हरीहारांना बदनाम करण्यासठी मोहिनी आणि शिवा संभोगाची कथा जोडून दिली आहे. मोहिनी हे विष्णू रूप होते, अवतार नव्हता. समुद्रमंथन वैश्विक घटना आहे. त्याला रूपक अर्थाने सांगितली जाते. पण, हिंदू धर्मातील देवी देवतांना बदनाम करण्यासठी कुठली कथा कुठेही चिकटवली जाते. आणि, दुर्दैवाने, हिंदू लोक देखील अशा कथांवर विश्वास ठेवतात.

या मंदिरात वय १० ते वय ५० या वयातील स्त्रियांना जाण्यास बंदी आहे. हा वयगट रजस्वला म्हणून ओळखला जातो. याच वयात स्त्रियांना पाळी येत असते. याचाच अर्थ म्हणजे, या मंदिरात फक्त पाळी येणाऱ्या वयाच्या स्त्रियांना बंदी आहे. सरसकट, सगळ्या स्त्रियांना बंदी नाही. अय्यप्पा व्रत ४१ दिवसांचे कठोर व्रत असते. या व्रतामुळे गुन्हेगार प्रवृत्तीची व्यक्ती देखील सुधरते, अस मानल जाते. मानसशास्त्र सांगते कि एखादी सवय २१ दिवस पुन्हा न केल्यास, ती सवय बंद होते. तसेच, जीवशास्त्र सांगते कि मनुष्याच्या पेशी २१ दिवसात पुन्हा बदलतात. तसेच, अय्यप्पाचे हे व्रत केल्याने प्रत्येकाला अध्यात्मिक अनुभव येतो. अयप्पा व्रत शरीर आणि मन शुद्धी साठी अत्यंत चांगला उपाय आहे. ते व्रत करतांना,

१. दिवसातून २ वेळा स्नान करणे आवश्यक आहे. २. फक्त शाकाहारी जेवण घेणे गरजेचे आहे ३. साधकाने व्रताच्या काळात कठोर ब्रम्हचर्य पालन करायला हवे ४. साधाकाने या व्रता दरम्यान ध्यान करून स्वतचे विचार शुद्ध करण्यास भर द्यावा. ५. ज्या गोष्टी भौतिक जगाशी सानिध्य वाढवतात अशा गोष्टीपासून दूर राहणे उदा. मनोरंजन. ६. साधकाने या काळात वाद विवाद, भांडणे टाळावीत ७. या काळात चप्पल वगैरे घालू नये. ८. कन्नी अय्याप्पाम (प्रथम साधक) ने अय्यप्पा दर्शनाला जातांना डोक्यावर इरुमुडीक्केतू घेऊन फक्त काळा कुडता आणि काळी मुंडू(धोतर) नेसावे.

प्रत्येक व्यक्तीला अध्यात्मिक उच्च पातळीवर नेणारे हे अय्यप्पा व्रत आहे. गेल्या वर्षी जवळजवळ ६ कोटी लोकांनी शबरीमालाला भेट दिली. धार्मिक यात्रेकरूच्या यादीत शबरीमाला आजही प्रथम क्रमांकवर आहे. नेमकी, हीच गोष्ट धर्मपरिवर्तन करणाऱ्या लोकांना नको आहे. त्यांनी अगोदरच शबरीमालाच्या आसपास काही चर्च देखील उभारले आहे. अय्यप्पाची अजून एक बदनामी केली जाते. ती म्हणजे अयप्पानी कुणातरी वावर स्वामी नावाच्या मुस्लीम व्यक्तीला दर्शन दिले होते. त्या वावरस्वामीचा दर्गा याठिकाणी आहे. वावर म्हणजे बाबर इकडेही घुसलेला आढळतो. अय्यप्पा भक्त अय्यप्पांचे दर्शन घेण्याअगोदर या वावर स्वामीचे दर्शन घेतात. भोळ्या भाळ्या लोकांना फसवून, त्यांच्या भावनेशी कसा खेळ होतो, ते या वावर स्वामीच्या निमित्ताने दिसून येते.

इस २००८ साली एक खळबळजनक बातमी आली. केरळ मधील, चेंग्नुर जवळच्या मुथावाझही सुब्रमानियन स्वामी मंदिरात जर्मनीच्या एका कंपनीला Satellite चित्रावरून Iridium हा अत्यंत दुर्मिळ धातू आढळून आला होता [९]. हे मंदिर २००० वर्षा पूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. त्यानंतर, तो Iridium धातू त्या मंदिरातून गायब करण्यात आला होता. काही मंदिरात Iridium सोबत तांबे देखील वापरले जात होते.

Iridium [Atomic No. 77] हा चांदीसारखा चकाकणारा, अत्यंत कठीण पदार्थ आहे. त्या धातूचा शोध इस १८०३ मध्ये लागल्याचे सांगितले जाते. Iridium हा धातू Platinum ला कठीण करण्यासाठी वापरला जातो. Iridium धातू मुख्यतः उल्केत आढळून येतो. तांबे आणि Iridium धातू खूप प्राचीन काळापासून मंदिराच्या गाभाऱ्यात टाकला जात असे (दुर्दैवाने आज, ते तंत्र आपण गमावलं आहे). या दोन्ही धातू संयुगात खूप साऱ्या विस्मयकारक शक्ती होत्या. इस २०१३ मध्ये अमेरिकेच्या उर्जा विभागाच्या Advanced Photon Source (APS) विभागात केलेल्या संशोधनानुसार [१], तांबे आणि Iridium च्या संयुगात Sr3CuIrO6 विचित्र चुंबकीय शक्ती आढळलेली आहे. हि चुंबकीय शक्ती इलेक्ट्रो Magnetic नसून इलेक्ट्रो-Static पद्धतीची होती. म्हणजे, ती एक स्थैतिक उर्जा होती किंवा ते संयुग स्थैतिक उर्जेचे स्त्रोत होते. याच अर्थ म्हणजे, ते संयुग लोखंड सोडून इतर गोष्टीनांच आकर्षित करत होते. त्याअगोदर भारतातील झारखंड राज्यात Copper-Iridium संयुगाचे काही नाणी सापडलेले आहे. त्यांना महाबिरी म्हटले जाते. हि नाणी ४ ते ८ इंचापासून तांदुळाचे/गव्हाचे दाणे आकर्षित करतात [३]. या नाण्यान्द्वारे, गाडीचे इंजिन देखील बंद करता येते (EMI). याचा अर्थ म्हणजे, Copper-Iridium संयुग तयार करण्याची पद्धती भारतीयांना खूप पूर्वीच्या काळापासून ठाऊक होती. आणि, हे संयुग, मंदिर बांधतांना, त्याकाळची लोक मंदिराच्या गाभाऱ्यात टाकत असावेत. हे संयुग गाभाऱ्यात धन प्रभारित (Positive) Scalar Waves निर्माण करत असतात.

Scalar Waves : – जेव्हा दोन सारख्या Frequency च्या पण एकमेकापासून उलट वाहणाऱ्या waves (तरंग) एकत्र आल्या कि Scalar Wave ची निर्मिती होते. याला Zero Point Field (ZPF) देखील म्हटले जाते. या एकेमेकाविरूद्ध वाहणाऱ्या waves विद्युतचुंबकीय उर्जेला Scalar Waves मध्ये परावर्तीत करत असते. मनुष्याच संपूर्ण शरीर याच scalar waves वर सुरु असते. या waves मधील विद्युतचुंबकीय उर्जा नष्ट झाल्यामुळे, त्याचं मोजमाप करणे आत्ताच्या विज्ञानानुसार शक्य नाही. या scalar waves सर्वप्रथम James Clerk Maxwell (1831-1879) या शास्त्रज्ञाने शोधून काढल्या होत्या. पण, त्याच्याच शिष्याने, Heinrich Hertz ने Maxwell चा हा दावा फेटाळून लावला होता. कारण, त्यांच्या म्हणण्यानुसार या waves फक्त Ether (अक्ष/आकाश) मध्ये वाहतात. जर, इथर काल्पनिक असेल तर मग या waves सुद्धा काल्पनिकच ठरतात. (इथर काल्पनिक नसून सत्य आहे त्याबद्दल मी मागच्या लेखात स्पष्ट केलेच होते) त्यानंतर, Nicola Tesla यांनी त्याच waves पुन्हा शोधून काढल्या. टेस्टला मे scalar waves कशा पाठवायच्या त्याबद्दलच तंत्रज्ञान शोधलं होते. पण, काही रहस्यमय कारणास्तव टेस्टला ने हा प्रकल्प गुंडाळला होता.

infinity (ज्याला मोबीस coil देखील म्हटले जाते) सारख्या वाहकातून एखादी wave गेली तर तिथे scalar उर्जा निर्माण होते. योगायोगाने, मानवी DNA ची रचना मोबीस coil सारखी आहे. हि scalar उर्जा धन(positive) आणि ऋण (negative) भारीतही असते. या दोन्हीहि प्रकारच्या उर्जा मानवी शरीरातून निघत असतात [१२].

मासिक पाळी दरम्यान स्त्रीच्या शरीरातून नको असलेले पदार्थ रक्ताद्वारे बाहेर टाकले जाते. हि प्रक्रिया १००% व्यवस्थित झाली पाहीजे नाहीतर त्याचे दुष्परिणाम स्त्रीच्या शरीरात दिसून येतात. मासिक पाळीत सगळे टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी स्त्रीला प्रचंड उर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे, त्या दरम्यानच्या काळात स्त्रीची scalar उर्जा ऋण झालेली असते. जर, मासिक पाळी व्यवस्थित न होणाऱ्या स्त्रियांना मतीमंद मुले होण्याचा धोका असतो. तसेच, पाळी व्यवस्थित न होणाऱ्या स्त्रियांना Endometriosis हा आजार होण्याचा धोका असतो.

Endometrium हि स्त्रीच्या गर्भाशयातील आतल्या बाजूची एक उती (Tissue) असते. गर्भाशयाचे वरच्या भागाला corpus म्हणतात. आणि खालचा अरुंद भागाला cervix म्हटले जाते. हे cervix, गर्भाशय आणि योनी मार्गाला जोडलेलं असते. गर्भाशयाच्या बाहेरच्या भागाला myometrium म्हटले जाते. Endometrium उती या गर्भाशयातील मऊ स्नायुंच्या रेषा असतात. त्या अत्यंत लवचिक असतात. Endometriosis या आजारात या उती गर्भाशयाच्या बाहेर वाढतात. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या मासिक पाळीत या अतिरिक्त वाढलेल्या उती कापल्या जातात आणि Endometrium ची वाढ नियंत्रित केली जाते.

प्रत्येक मासिक पाळीच्या चक्रात अंडाशयातून एक हार्मोन, estrogen स्त्रवते. या estrogen मुळे endometrium जाड होतात. पुन्हा, मासिक पाळीच्या चक्राच्या मध्यात अंडाशय दुसरा हार्मोन, progesterone स्त्रवते. गर्भधारण करतांना progesterone हार्मोन endometrium च्या आतल्या भागाला भ्रूण तयार करण्यास सहाय्य करते. जर, गर्भधारण झाला नाही तर, सगळे हार्मोन एकदम कमी होतात आणि वाढलेल्या endometrium उती मासिक पाळीचे द्रव बनून बाहेर येते. आणि, अशा रीतीने मासिक पाळीचे चक्र पूर्ण होते.

progesterone हा हार्मोन estrogen ला विरोध करत असतो. त्यामुळे गर्भाशय अतिरिक्त endometrium बाहेर काढतो.

जेव्हा मासिक पाळी असणारी स्त्री एखाद्या धन प्रभारित scalar उर्जेच्या संपर्कात आली तर endometrium उती अपूर्णपणे नष्ट होण्याचा धोका असतो. आणि, त्यांचे दुष्परिणाम स्त्रीच्या शरीरावर होतात.

प्राचीन काळात बांधलेल्या मंदिरात Iridium-Copper च्या संयुगामुळे निर्माण होणारी धन प्रभारित scalar उर्जा स्त्रीच्या मासिक पाळीत अडथळा आणत असल्यामुळे अशा मंदिरात मासिक पाळीच्या स्त्रियांना बंदी केलेली होती. त्यामागे, फक्त स्त्रियांच्या आरोग्याची काळजी होती, भेदभाव नव्हता.

संदर्भ :
१. https://m.phys.org/news/2013-08-physics-copper-iridium-compound.html
२. https://ajitvadakayil.blogspot.com/2018/11/5900-year-old-sabarimala-this-planets.html
३. https://worldstopsecrets.wordpress.com/what-is-copper-irridium/
४. https://lifespa.com/moody-painful-menstrual-cycle/
५. https://www.hinduwebsite.com/hinduism/essays/breath.asp
६. https://www.youtube.com/watch?v=GRpolh-aFWY
७. https://en.wikipedia.org/wiki/Nambudiri
८. https://timesofindia.indiatimes.com/india/Rumours-of-iridium-in-temple-dome-has-Kerala-village-in-a-flutter/articleshow/3742188.cms
९. https://www.thehindu.com/news/national/kerala/finial-stolen-from-kerala-temple/article2554820.ece
१०. https://www.tokenrock.com/explain-scalar-wave-technology-77.html
११. https://www.quwave.com/Scalar-Waves.html
१२. http://www.whitetv.se/mind-control-mk-ultra/214-our-body-works-with-scalar-waves.html

(संकलित)

About the Author Devi Vaibhavishriji

Devi VaibhaviShriji teaches Art of Living courses & addresses audiences all across the Maharashtra state throughout the year. Deviji has delivered spiritual discourses on Shrimad Bhagwat Katha, Srimad Devi Bhagavatam, Shri Ram Charit Manas, Bhagavad Gita and Shiv Maha Puran in almost all cities of Maharashtra Specially in Marathi & Hindi languages, with a unique way by relating it to an ordinary man’s day-to-day life. Thousands of lives have been experienced peace, harmony and joy through the knowledge of Her oratory skills and sweet singing voice.

1 comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: