मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा – देवी वैभवीश्रीजी

5 October 2017 वाशीम / प्रतिनिधी

आजही मुलामुलींमध्ये भेदभाव केल्या जातो. अनेक ठिकाणी मुलींच्या जन्मानंतर तीला कचराकुंडी, रेल्वेस्टेशन, बसस्थानक आदी परिसरात टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. जर मुली जन्माला आल्या नाही तर आपल्याला बहिण, बायको, आई मिळणार नाही. मुलींच्या जन्माचे स्वागत उत्सवाने करा, असे आवाहन श्रीश्री रविशंकर यांच्या कृपापात्र शिष्या देवी वैभवीश्रीजी यांनी अमृतवाणीतून ४ ऑक्टोंबर रोजी श्री हनुमान रामकथेच्या तृतीय पुष्पात केले.
स्थानिक शुक्रवारपेठ येथील ज्ञानगंगा परिसरात बोलताना देवी वैभवश्रीजींनी पुढे सांगितले की, आज अनेक जण कन्येची जन्मापुर्वीच स्त्रीभ्रूणहत्या करतात. हा देशाला लागलेला कलंक आहे. मुलींना सुध्दा जन्माला येवू द्या. कारण भविष्यात ती लता मंगेशकर, सुनिता विल्यम, झाशीची राणी बनु शकते. मुलींनी सुध्दा श्रृंगार करतांना संस्कृतीचे भान ठेवावे. ज्यामुळे वासना उत्पन्न होईल असे वस्त्र परिधान करु नये. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केलेला श्रृंगार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणातून प्रकाशित झाला आहे. ज्या दिवशी या देशामध्ये खर्‍या अर्थाने मुलींना समान दर्जा देवून तीचा सन्मान केल्या जाईल त्यादिवशी निश्‍चितच दुष्काळ नष्ट होईल. प्रकृती आनंद व्यक्त करुन भरपुर पाण्याचा वर्षाव करील असे त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृती घेण्यापेक्षा देण्याला महत्व देते. जेव्हा आपण कुणाला मदत करतो तेव्हा तो प्रसाद बनतो. जिथे कथा होते ते र्तिर्थ बनते. चांगले कर्म आपल्याला आनंद मिळेल म्हणून करु नका तर आनंदाने चांगले कर्म करा. कथेमुळे जीवनाची व्यथा नष्ट झाली पाहीजे. सदगुरूची निवड करताना त्याची पूर्णपणे खात्री करून घ्या. धर्मग्रंथात साधु व संताचे लक्षण दिलेले आहे. भगवंताच्या कृपेने मिळालेले पद कुणीही घेवू शकत नाही. गुरुंच्या प्रती सर्मपणाची र्शध्दा ठेवा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डॉ. हरिष बाहेती, डॉ. सौ. सरोज बाहेती, जमनादास बाहेती, सनदी लेखापाल बालकिसन बाहेती, डॉ. जयकिसन बाहेती, प्रवीण बाहेती, राम बाहेती, गुड्ड बाहेती, व्दारकादास बाहेती, संदीप बाहेती यांनी पर्शिम घेतले.
गुरुवार ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत जिर्णोध्दार व पुन:स्थापना, दुपारी १ ते ४ महाप्रसाद व सायंकाळी ७ वाजेपासून महारास सत्संग, ध्यानज्ञानचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचा भाविकभक्तांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक बाहेती परिवाराने केले आहे.

Published in http://www.lokmat.com/vashim/celebrate-birth-girls/

 

Devi Vaibhavishriji Shrimad Bhagwat Katha Srimad Devi Bhagavatam Ram Katha Shiv Maha Puran Art of Living Programs
Devi Vaibhavishriji Shrimad Bhagwat Katha Srimad Devi Bhagavatam Ram Katha Shiv Maha Puran Art of Living Programs
Advertisements